आताच शेअर करा

दिनांक: ११/१०/२०२६

न्हावेली /वार्ताहर
    मळेवाड जंक्शन येथे आज सकाळी सातच्या सुमारास मिनी ट्रॅव्हलर बस आणि दुचाकी यांच्यात अपघात झाला. या अपघातात आरोंदा-भटपावणी येथील नितीकेश अनिल नाईक (३४) हा युवक जखमी झाला. तो कामानिमित्त दुचाकीवरून गोव्याच्या दिशेने जात होता.याबाबत अधिक माहिती अशी की, गोव्याहून चिपी विमानतळाच्या दिशेने जाणारी मिनी ट्रॅव्हलर बस मळेवाड जंक्शन येथील उतारावर आली असता, गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकी यांच्यात धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वार नितीकेश नाईक जखमी झाला. अपघात घडताच स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ मदत करत जखमी युवकाला मळेवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथे डॉ. विक्रम मस्के यांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी त्याला सावंतवाडी येथे हलविण्यात आले.
    घटनेची माहिती मिळताच आरोंदा पोलीस उपनिरीक्षक महेश अरवारी आणि हेडकॉन्स्टेबल बाबुराव जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अपघातस्थळाची पाहणी करून पंचनामा केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed