आताच शेअर करा

दिनांक: ११/१०/२०२६

सावंतवाडी:१५व्या वित्तआयोगा अंतर्गत माजगाव गावात ४५ लाख रुपयाचा निधी ची कामे मंजूर केल्याबद्दल जिल्हा परिषद सदस्य यांचे हार्दिक अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात येत आहेत.
ठराव क्रमांक १३,  १५ जिल्हा परिषद सदस्य विक्रांत विकासभाई सावंत यांनी आपल्या प्रभागातील ग्रामपंचायत माजगाव क्षेत्रातील नागरी सुविधा व विकासाच्या दृष्टीने पंधराव्या वित्त आयोगा अंतर्गत ४५ लाख रुपयाचा निधी कामे मंजूर करून आणली आहेत.
सदरच्या निधीमुळे गावातील मुख्य व आवश्यक विकास कामांना मोठी गती मिळणार असून ग्रामपंचायतच्या सोयी सुविधांमध्ये भरीव सुधारणा होणार आहे. लोकप्रतिनिधी म्हणून गावच्या विकासासाठी त्यांनी दाखवलेली तत्परता आणि केलेल्या विशेष प्रयत्नाबद्दल माजगाव ग्रामपंचायत जिल्हा परिषद सदस्य विक्रांत विकासभाई सावंत यांचे कौतुक करत मनापासून अभिनंदन केले आहे व मनःपूर्वक आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed