आताच शेअर करा

दिनांक:२६/११/२०२६

बांदा:दिवाळीच्यासुट्टीनंतर बुधवारपासून घारपी शाळेसह जिल्ह्यातील सर्व  जिल्हा परिषदेच्या शाळा पुन्हा सुरू झाल्या. सन २०२६-२७या शैक्षणिक वर्षातील दुसरे सत्र सुरू झाल्याने शाळेचा परिसर पुन्हा एकदा मुलांच्या किलबिलाटाने गजबजून गेला. गेले पंधरा दिवस बंद असलेल्या शाळा आज
सकाळी सुरू होताच घारपी शाळेत विद्यार्थ्यांचे उत्साहात ‌स्वागत करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक  जे. डी. पाटील, सहकारी शिक्षक आशिष तांदुळे व धर्मराज खंडागळे यांसह शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य यांनी विद्यार्थ्यांचे हसत मुखाने स्वागत केले.
बऱ्याच दिवसांनी मित्र-मैत्रिणी भेटल्याने मुलांमध्ये वेगळाच आनंद दिसत होता. मामाच्या गावी गेलेले अनुभव, नवीन कपडे याच्या गप्पा रंगल्या होत्या. शिक्षकांनी मुलांना सुटीतील अनुभव विचारले आणि दुसऱ्या सत्रातील अभ्यास व उपक्रम यांची माहिती दिली.
या दुसऱ्या सत्रात शाळेमध्ये शैक्षणिक सहल, वनभोजन, कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव, विज्ञान प्रदर्शन, स्काऊट-गाईड जिल्हा मेळावा, बालआनंद मेळावा, वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण समारंभ,शालेय परसबाग स्पर्धा , थोर पुरूषांच्या जयंती व पुण्यतिथी कार्यक्रम असे विविध उपक्रम राबविले जाणार आहेत.
या उपक्रमांमुळे मुलांचा सर्वांगीण विकास होणार असून पालकांनी मुलांना नियमित शाळेत पाठवावे, असे आवाहन मुख्याध्यापक श्री. जे. डी. पाटील यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed