आताच शेअर करा

दिनांक:२६/११/२०२६

सावंतवाडी : संविधान दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावर आयोजित करण्यात आलेल्या गड-किल्ले स्वच्छता व संवर्धन अभियानाचा लोकार्पण सोहळा तसेच संविधान उद्देशिकेच्या शपथ व स्वच्छता अभियान हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपकभाई केसरकर साहेब व कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार निलेशजी राणे साहेब यांच्या समवेत शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, दत्ता सामंत, जिल्हा परिषद सभापती संतोष साटविलकर,मालवण उपनगराध्यक्ष दीपक पाटकर,माजी नगराध्यक्ष अशोक तोडणकर, महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे रिजनल ऑफिसर नीलेश पाटील आदी शिवसेना पदाधिकारी ,नगरसेवक,जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, सामाजिक न्याय विभाग, पर्यटन विभाग आणि सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गड-किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व जपणे, परिसर स्वच्छ ठेवणे आणि त्यांच्या संवर्धनाबाबत जनजागृती करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश होता. संविधान दिनानिमित्त उपस्थितांनी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून स्वच्छता व ऐतिहासिक वारसा जतन करण्याचा संदेश दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed