आताच शेअर करा

दिनांक: २२/०९/२०२६

बांदा: बांदा :
    बांदा शहरातील महावितरणच्या विविध समस्यांबाबत महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता श्री. वनमोरे यांची ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत, आबा धारगळकर, सामाजिक कार्यकर्ते गुरु कल्याणकर व बाबा काणेकर यांनी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
बांदा शहरातील पाचही वॉर्डमध्ये वीजपुरवठ्याशी संबंधित विविध समस्या निर्माण झाल्या असून, वारंवार वीजपुरवठा खंडित होण्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच अनेक ठिकाणी विद्युत खांब व वीजवाहिन्यांवर झाडे-वेली वाढल्याने वीजपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी ट्रान्सफॉर्मर खराब झाल्याने त्याच्या दुरुस्तीचा प्रश्नही निर्माण झाला आहे.
या सर्व समस्यांची माहिती यावेळी मुख्य कार्यकारी अभियंता वनमोरे यांना देण्यात आली. वीजवाहिन्यांवर आलेल्या झाडांच्या फांद्या व वेली तातडीने तोडणे, खराब ट्रान्सफॉर्मरची दुरुस्ती करणे, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत करणे तसेच नागरिकांच्या इतर वीजविषयक अडचणींचे निराकरण करण्याची मागणी करण्यात आली.
बांदा शहरातील नागरिकांना सुरळीत व सुरक्षित वीजपुरवठा मिळणे आवश्यक असून, संबंधित समस्यांवर तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. याबाबत महावितरणकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला असून, दिवाळीपूर्वी बांदा शहरातील वीजपुरवठ्याशी संबंधित समस्या शक्य तितक्या मार्गी लावून व्यवस्था सुरळीत करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *