आताच शेअर करा

दिनांक: २१/०९/२०२६

सावंतवाडी: शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक श्री. संजू परब यांच्या मडुरे-परबवाडी येथील निवासस्थानी कुडाळ-मालवण मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री. निलेशजी राणे साहेब यांनी भेट देत श्री गणरायाचे दर्शन घेतले.

यावेळी श्री. निलेशजी राणे साहेब यांनी गणरायाची मनोभावे पूजा करून आशीर्वाद घेतले. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या समवेत शिवसेना उपजिल्हाप्रमुख शावियर  फर्नांडिस,युवा सेना तालुकाप्रमुख क्लेटस फर्नांडिस,मडूरे सरपंच उदय चिंदरकर,त्याच प्रमाणे शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच परब कुटुंबीय व स्नेही उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *