आताच शेअर करा

दिनांक:२२/११/२०२६

तळवणे (प्रतिनिधी) : शंकर गावडे

       तळवणे गावामध्ये १९ आणि २० नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या विविध सांस्कृतिक, पारंपरिक आणि कलागुणांना वाव देणाऱ्या सर्व स्पर्धा व कार्यक्रमांना ग्रामस्थांचा उदंड प्रतिसाद मिळाला. या दोन्ही दिवसांतील सर्व स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन ‘तळवणे थंडर क्रिकेट क्लब व नवयुवक नाट्य संपदा, तळवणे’ यांच्यातर्फे करण्यात आले होते.  

    गावातील महिलांच्या सुप्त कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी गाव मर्यादित ‘तळवणेची गृहलक्ष्मी २०२६’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महिलांसाठी पारंपरिक वेशभूषा, रांगोळी आणि पाककला स्पर्धा पार पडल्या, तर पुरुषांमधील सर्जनशीलतेला चालना देण्यासाठी गाव मर्यादित पर्यावरणपूरक आकाशकंदील स्पर्धा घेण्यात आली. यासोबतच नृत्यप्रेमींसाठी खुल्या गटातील नृत्य स्पर्धेने कार्यक्रमाची रंगत आणखी वाढवली.

     दोन दिवस चाललेल्या या कलाविष्कारात स्पर्धकांनी एकापेक्षा एक सरस सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धांचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला असून विजेत्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.   १९ नोव्हेंबर : ‘तळवणेची गृहलक्ष्मी २०२६’ स्पर्धा निकाल (गाव मर्यादित – महिला गट)महिलांनी पारंपरिक पेहराव, आकर्षक रांगोळ्या आणि चविष्ट पदार्थांच्या माध्यमातून आपल्या कौशल्याची चुणूक दाखवली. या स्पर्धांचा निकाल खालीलप्रमाणे आहे:  

पारंपरिक वेशभूषा स्पर्धा:

प्रथम क्रमांक – कृपाली नवसो पेडणेकर  
द्वितीय क्रमांक – नव्या शंकर गावडे  
तृतीय क्रमांक – पपिहा महेश तळवणेकर 

रांगोळी स्पर्धा:
प्रथम क्रमांक – पपिहा महेश तळवणेकर  
द्वितीय क्रमांक – गौरी सदानंद गावडे 
तृतीय क्रमांक – सौ. स्वरा सागर गावडे 

पाककला स्पर्धा:
प्रथम क्रमांक – सायली सुनील चोडणकर  
द्वितीय क्रमांक – मनाली महेश तळवणेकर  
तृतीय क्रमांक – मुग्धा महादेव गावडे 

खेळ पैठणीचा:  
प्रथम क्रमांक – सौ. राखी विशाल तळवणेकर  
द्वितीय क्रमांक – सौ. रक्षंदा रामकृष्ण तळवणेकर  
तृतीय क्रमांक – सौ. स्वरा सागर गावडे 

    २० नोव्हेंबर : पर्यावरणपूरक आकाशकंदील स्पर्धा निकाल (गाव मर्यादित – पुरुष गट)पर्यावरण रक्षणाचा संदेश देत गावातील पुरुषांनी टाकाऊ आणि पर्यावरणपूरक साहित्यापासून आकर्षक आकाशकंदील साकारले. या स्पर्धेतील विजेते खालीलप्रमाणे: 

प्रथम क्रमांक: संतोष गावडे   द्वितीय क्रमांक: ओंकार गावडे   तृतीय क्रमांक: सुमित गावडे 

   २० नोव्हेंबर : ‘खुली सोलो नृत्य स्पर्धा २०२६’ अंतिम निकाल (खुला गट)स्पर्धकांनी आपल्या बहारदार नृत्याविष्काराने प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. परीक्षकांसमोर अटीतटीची लढत पाहायला मिळाल्यानंतर खालील विजेत्यांची निवड करण्यात आली:  

प्रथम क्रमांक: नंदिनी भिले   द्वितीय क्रमांक: राम म्हसने  
तृतीय क्रमांक: सर्वेद गावकर  

उत्तेजनार्थ पारितोषिके:
स्पर्धेतील उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल खालील तीन स्पर्धकांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले:  
१. समर्थ गवंडी  
२. लाव्या नाईक  
3. ३. पूर्वा मिस्त्री  

  या संपूर्ण सोहळ्यामुळे गावामध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. सर्व विजेत्यांचे आणि सहभागी स्पर्धकांचे आयोजक तसेच ग्रामस्थांकडून मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed