
दिनांक: १४/०७/२०२६
बांदा: बांदा येथे युगेन इम्प्रा कंपनी काही वर्षा पुर्वी आपला तळ ठोकला.आणि या कंपनीने सर्वं नंबर २१८/१,२१८/२आणि २१८/४ या सर्वे नंबरमधील तब्बल ३३ एकर जमीन विकत घेतली व प्लॉटिंग केले . या जागेत त्यांनी रेसिडेंटल प्रोजेक्ट सुरू केले आहे. सदरचा परिसर हा इको सेन्सेटिव झोन मध्ये येत असून इ सी असल्याशिवाय असे प्रोजेक्ट राबवण्यास शासनाची बंदी आहे. या कंपनी बाबत नियमांचे उल्लंघन केल्या बाबत एन जी टी मध्ये दावा क्रमांक o. अ. 69/2025WZ PUNE या नंबर खाली चालू आहे. त्यामुळे झाडे तोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. प्रोजेक्ट मध्ये तब्बल १३१९ झाडांची कत्तल आज पर्यंत करण्यात आली आहे. असा दावा बांदा येथील समाजसेवक साईप्रसाद मंगेश कल्याणकर यांनी केला आहे. तसेच रस्त्याची परवानगी घेतलेली नाही. रस्ते करण्यासाठी शासनाची रॉयल्टीही भरलेली नाही. सदर प्रकरणाची माहिती लेखी स्वरूपात ग्रामपंचायतीला देण्यात आली आहे.त्यानुसार ग्रामपंचायतीने ही कंपनीला झाडे तोडण्यास बंदी असल्याचे कळविले आहे. असे असतानाही नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास येत आहे. नियमांचे पालन न केल्यास कारवाई करण्यासाठी पुढील पाऊले उचलली जातील असे कल्याणकर यांनी म्हटले आहे.
