
दिनांक:०५/०७/२०२६
सावंतवाडी: जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक शाळा सोनुर्ली नंबर १ शाळेतील कु. यश नागेश गावकर हा उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती इयत्ता पाचवी परीक्षेत २१० गुण मिळवून शिष्यवृत्तीधारक बनला. जिल्हा ग्रामीण गुणवत्ता यादी त्याने ६७ वे स्थान त्याने पटकावले. या यशात त्याच्या वर्गशिक्षिका सौ .रोशनी रोशन राऊत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच पालकांचे सहकार्य लाभले.
शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी कु. यश गावकर सर्व पात्र विद्यार्थी कु. गौरांग गावकर, कु. नितीन सावंत, कु. भगवान पाल्येकर हे सर्व विद्यार्थी या यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक व शाळेतील शिक्षक सौ.सृष्टी धुरी, रोशनी राऊत , सौ.समृद्धी सोनुर्लेकर श्री. रोहित गणपुले या सर्वांचे शाळा व्यवस्थापन समिती सोनुर्ली नंबर एक ने अभिनंदन केले. आजगाव प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी तथा माळगाव केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. शिवाजी गावित सर यांनी यशस्वी विद्यार्थी, शिक्षक व पालक यांचे अभिनंदन केले.
