आताच शेअर करा

दिनांक: २३/०५/२०२६

संपादकीय: महसूल विभागात अनेक कर्मचारी कार्यरत आहेत. काहीजण आपल्या जबाबदारीला पक्के असतात, काहीजण आपल्या चौकटीला. तर काहीजण आपल्या कार्याच्या माध्यमातून लोकांच्या मनात कायमचं घर बनवतात. अशाच व्यक्तींपैकी एक नाव म्हणजे वर्षा नाडकर्णी. पेशांनं तलाठी असलेल्या वर्षाताई म्हणजे केवळ कर्मचारी नसून समाजाशी जोडलेलं संवेदनशील व्यक्तिमत्व म्हणजे वर्षा नाडकर्णी.
सरकारी पदावर काम करत असताना अधिकाराचा गर्व अनेकांना नकळत स्पर्श करून जातो. पण या व्यक्तीला अहंकाराचा लवलेशही कधी शिवला नाही. त्यांच्या वागण्यात माणुसकी आहे संवादात आत्मीयता आहे आणि कामात प्रचंड प्रामाणिकपणा आहे. गोरगरिबांच्या समस्या समजून घेऊन त्यांना मदतीचा हात देण्यासाठी त्या सदैव पुढे असतात. कार्यालयीन वेळ संपल्यावर एखाद्या गरजवंताचं काम अडू नये म्हणून स्वतःचा वैयक्तिक वेळ देऊन ते काम करून देणे हा त्यांचा स्वभाव आहे. इथल्या मातीशी नाळेचा संबंध असल्याने शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यात त्या नेहमीच अग्रेसर असतात. बालपण गरिबीत गेल्यामुळे गरिबीची जाण   आहे. आणि म्हणूनच गरिबीची कदर करत गरिबाला मदतीचा हात देण्यात त्या कधीही मागे हटल्या नाहीत . केवळ टेबल मागे बसून काम करणाऱ्या अधिकारी नाहीत तर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी तत्पर असलेल्या कर्मचारी आहेत.
       वर्षा नाडकर्णी यांचं व्यक्तिमत्व जितकं संवेदनशील आहे तितकंच कठोर निर्णय घेणार धैर्यशील सुद्धा आहे. समाजातील धनदांडग्यांचे कुटील डाव त्या अचूक ओळखतात आणि चुकीच्या गोष्टींना योग्य शब्दात फटकारण्याची ताकद त्यांच्यामध्ये सामावलेली दिसते. खोटारडेपणा आणि अन्यायाची प्रचंड चीड त्यामुळे सामान्य माणसासाठी एक आधार तर चुकीच्या प्रवृत्तीला योग्य धडा शिकवणारी रणरागिणी म्हणजे वर्षा नाडकर्णी.
त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक सुंदर पैलू म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रमाविषयी असलेली त्यांची ओढ. सरकारी सेवेत असूनही विविध सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा सन्मानाने सहभाग असतो. वडील एक उत्कृष्ट नाट्यकर्मी असल्याने  तिला नाट्यकलेची विशेष आवड . ऐतिहासिक नाटकांचा अभ्यासपूर्वक आस्वाद घेणाऱ्या वर्षाताई अनेक व्यासपीठावर सन्मानपूर्वक उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवतात. इतकंच नव्हे तर वडिलांची उपजत कला सांभाळत असताना दरम्यानच्या एका कार्यक्रमांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांची वेशभूषा करून अनेक रसिकांची मन जिंकली. महिलांचे कार्यक्रम असो सामाजिक उपक्रम असो किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असो  सरकारी सेवा बजावत असताना सुद्धा प्रत्येक ठिकाणी आवर्जून उपस्थित राहून मोठमोठी व्यासपीठं वर्षाताई भूषवतात.
  जिद्द कशी असावी कार्यतत्परता म्हणजे काय आणि परिस्थितीशी दोन हात करून माणूस म्हणून कसं जगावं  याचे उत्तम उदाहरण म्हणजे वर्षा नाडकर्णी. महसूल विभागातील त्यांचं कार्य म्हणजे एक प्रशासकीय जबाबदारी नाही तर लोकांशी जोडलेलं संवेदनशील नातं आहे.
आजच्या काळात माणुसकी जपणारी समाजासाठी झटणारी लोकांच्या मनात घर करणारी व्यक्ती मिळणे म्हणजे केवळ दुरापासच. वर्षा नाडकर्णी म्हणजे अशाच एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वांपैकी आहेत. ज्या केवळ तलाठी नाही तर खऱ्या अर्थाने संवेदनशील मनाने लोकांसाठी धडपडणाऱ्या समाजसेविका आहेत.
                        शब्दांक
                       नाट्यदिग्दर्शक,लेखक           छत्रपती संभाजी फेम. श्री गणेश ठाकूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *