आताच शेअर करा

बांदा प्रतिनिधि:संकेत वेंगुर्लेकर 

दिनांक :६ जुलै २९२४


बांदा येथिल श्री विठ्ठल मंदिरात प्रतिवर्षावप्रमाणे यंदाही हरिनाम वीणा सप्ताहाला मंगळवार दि.९ जुलै पासुन प्रारंभ होत आहे.

या सप्ताहानिमित्त मंदिरात सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दि. १६ रोजी सप्ताहाची सांगता होणार असून बुधवार दि. १७ जुलै रोजी आषाढी एकादशीचा भव्य सोहळा होणार आहे. या वीणा सप्ताहाच्या नियोजनासाठी पारप्रमुख व सेवेकरी मंडळींची नुकतीच मंदिरात बैठक झाली. या बैठकीला वीणा सप्ताह नियोजन प्रमुख प्रकाश मिशाळ, दत्तप्रसाद पावसकर ,मंगलदास साळगांवकर, श्रीप्रसाद वाळके, उमेश काणेकर, सुदन केसरकर, अजय महाजन,राजेश पावसकर, विनित पडते, गौरव महाजन, संदेश पावसकर,सुनिल नाटेकर,मंथन विरनोडकर,अचल पावसकर,हर्षल बांदेकर,अजय नागझरकर, आशुतोष भांगले आदी उपस्थित होते.
यावेळी निश्चित केलेले सप्ताहाचे पार पुढील प्रमाणे आहेत. मंगळवार दि. ९ जुलै आळवाडा विनीत पडते, बुधवार दि. १० रोजी गांधीचौक सुदन केसरकर, गुुरुवार दि. ११ रोजी निमजगा गवळीटेंब संदेश पावसकर, शुक्रवार दि.१२ जुलै रोजी देऊळवाडी श्रीप्रसाद वाळके, शनिवार दि. १३ जुलै रोजी हॉस्पिटल कट्टा उमेश काणेकर, भाई शिरसाट, रविवार दि. १४ रोजी मारुतीगल्ली दत्तप्रसाद पावसकर, सोमवार दि.१५ जुलै रोजी उभाबाजार निलेश महाजन मंगळवार दि. ९ जुलै रोजी सकाळी १२ वाजता श्री विठ्ठल नामाच्या गजरात भाविकांच्या उपस्थितीत वीणा घेऊन सप्ताहास सुरुवात होईल. मंगळवार दि. १६ रोजी दुपारी १२ वाजता सप्ताहाची सांगता होईल. सप्ताहानिमित्त दररोज नामस्मरण, भजन, गजर, सायंआरती तसेच सायंकाळी ५ ते ६.३० स्थानिक महिलांची भजनसेवा व रात्री १० ते १२ या वेळेत स्थानिक नित्य भजनकर्मींची भजनसेवा होईल. भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घेण्याचे
आवाहन श्री विठ्ठल मंदिर ,बांदा च्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *