आताच शेअर करा

दिनांक: २५/०३/२०२६

संपादकीय: कालपर्यंत जो ‘अदृश्य कुबेर’ बनून सामान्यांच्या डोळ्यांत धूळ फेकत होता, त्या खरात बाबाच्या ढोंगाचा बुरखा आज सणसणीतपणे फाटला आहे. श्रद्धेच्या नावाखाली मांडलेला हा अघोरी बाजार आणि चमत्काराचा तो बनावट खेळ अखेर संपला कायद्याच्या चौकटीत असा काही अडकला की, बाबाची पुरती ‘परात’ फिरली आहे.
हा चमत्कार कोणत्याही मंत्राचा नाही, तर हा चमत्कार आहे जागृत समाजाचा आणि सडेतोड तपासाचा कॅमेऱ्यांच्या फुटेजमध्ये या ढोंगी बाबाचे काळे कारनामे कैद झाले, तेव्हाच त्याच्या पापाचा घडा भरला होता . छुप्या कॅमेऱ्यांनी आणि पीडितांच्या हिंमतीने या ‘कुबेराची’ माया उघड्यावर आणली. मधाच्या बाटल्या लाखाला विकणारा आणि २० फुटी नागाचा धाक दाखवणारा हा ठग, विज्ञानाच्या आणि पुराव्यांच्या एका फटक्यात जमिनीवर आला.
या भोंदूबाबाची वरात काढली ती पोलिसांच्या कडक खाक्याने पोलिसांनी ‘टायरात घालून’ दिलेला पोलिस प्रसाद, हीच या बाबाची खरी ‘वरात’ ठरली. ज्यांच्या श्रद्धेशी हा खेळला, त्या माय-माऊलींच्या संतापाने आणि कायद्याच्या बड्याने या भोंदूगिरीचा अंत केला.
माझ्या माय-माऊलींना कळकळीची हाक मारतो या अदृश्य कुबेराच्या मागे लागून स्वतःचे घरदार उद्ध्वस्त करून घेऊ नका. तिथे जाण्यासाठी ‘भूलवणारा’ मार्ग आहे, या भुलभूलय्या दुनियेला भुलू नको कारण  तिथून सन्मानाने परतण्याची वाट मात्र कायमची बंद होते.
वास्तववाद स्वीकारा कर्मकांड करुन कधीही गरिबी जात नाही, ती केवळ कष्टाने आणि नियोजनाने जाते.
विकासाकडे झेप घ्या मंत्रांच्या जपापेक्षा मुलांच्या अभ्यासावर आणि कुटुंबाच्या प्रगतीवर लक्ष द्या.
व्यसनमुक्त व्हा सुसंस्कृत बना होईल तुमचा तुमचा उत्कर्ष खरा यश हे आपल्या कर्मात आहे, कोणत्याही बाबाच्या अंगठ्यात नाही.

भोंदूचा बाजार
खोट्या मंत्रांच्या जाळ्यात जो कोणी अडकला,
तो आयुष्याच्या शर्यतीत कायमचा हरला ।
खरातबाबाचे आता वाजले की बारा,
कारनामे त्याचे आज बघेल जग सारा ॥ १ ॥
भोंदूची ही निघाली आज पहा वरात,
अंधश्रद्धेचे हे विष पसरविले घरा घरात ।
माय-माऊलींनो आता तरी व्हा शहाणे,
सोडा आताभोंदूबाबांच्या पाया पडणे  ॥ २ ॥
सोडा ही गुलामी अन अंधश्रद्धा सोडा,
भोंदूगिरीचा हा कचाटा आता तुम्ही तोडा ।
विज्ञानाची कास धरून विकासाकडे जा,
कष्टाच्या घामातून सुखाचा घास खा ॥ ३ ॥
वास्तववाद स्वीकारा, होईल उन्नती,
बुवाबाजीने कधी न लाभते सद्गती ।
विश्वासाने पाऊल टाका सत्याच्या वाटेवर,
झेंडा फडकवा प्रगतीच्या उंबरठ्यावर ॥ ४ ॥

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *