
दिनांक: १४ /०२/२०२६
सातार्डा:कर्तव्य दक्ष कवठणीचे सरपंच अजित कवठणकर यांनी आत्ताच जिल्हापरिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणूक संपताच आपल्या कामाची सुरूवात केली असून कवठणी मुख्य रस्ता ते काळोबा मंदिर पर्यंत रस्ता कामाचे नूतनीकरणाचे उद्घाटन दिनांक १२ फेब्रुवारी २०२६ रोजी करण्यात आले. यावेळी सरपंच अजित कवठणकर ,ग्रामपंचायत सदस्य अजय सावंत, सोनम कवठणकर व कंत्राटदार बांदिवडेकर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
