आताच शेअर करा

दिनांक: ११/०२/२०२६

सावंतवाडी: पंडित दीनदयाळ उपाध्याय स्मृती प्रित्यर्थ आज सावंतवाडी येथील भाजपा जनसंपर्क  कार्यालयात समर्पण दिवस साजरा करून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. सर्वप्रथम भाजपा युवानेते विशालजी परब यांच्या हस्ते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. सहसंयोजक केतन आजगांवकर यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या कार्याची महती विषद केली व कार्याचे स्मरण केले. यावेळी भाजपा युवानेते विशालजी परब, सहसंयोजक केतन आजगांवकर, मळेवाड उपसरपंच हेमंत परब, आजगाव शक्ती केंद्र प्रमुख ओंकार प्रभू, गिरीष परब, बंड्या दळवी, भाजपा राज्य सोशल मिडिया प्रमुख अविनाश पराडकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed