आताच शेअर करा

दिनांक: १६/१/२०२६

वेंगुर्ला: वेंगुर्ले तालुक्यातील  अणसूर पाल येथील मडकिलवाडी येथे आपल्याला पोटच्या मुलानेच आईवर गोळी झाडून  जीव घेतला. मयत महिलेचे वय अंदाजे ६५ वर्षे असे आहे. या प्रकरणाचा वेंगुर्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

   ही घटना दि. १४ जानेवारी २०२६
रोजी रात्री ०८:०० च्या सुमारास घडली. या घटनेची फिर्याद सौ. जागृती जयेश सरमळकर यांनी दिली. ते मुळ अणसूर येथील असून सध्या ते  वेंगुर्ला येथे वस्तीस्थान आहे.

    उमेश वासुदेव सरमळकर असे संशयिताचे नाव असून ते अणसूर,  मडकिलवाडी येथे राहायला असतात. संशयितावर बीएनएस 103(3) तसेच शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 3,25,27,29 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1), 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    संशयित उमेश सरमळकर हा  बँक मधून, बचत गटाकडून कर्ज घ्यायचा.कर्जाचा बोजा डोक्यावर वाढल्याने  आई आणि आरोपी मुलगा यांच्यात सतत भांडणे होत असत. ज्यादिवशी ही घटना घडली त्यादिवशी मयत वासंती सरमळकर या अंगणात बसलेल्या असताना संशयित उमेश सरमळकर याने आपल्या घराच्या छपरावर चढून बंदुकीची गोळी झाडून आपल्याच जन्मदात्या आईचा जीव घेतला. ही झाडलेली बंदुकीतील गोळी मयत वासंती सरमळकर यांच्या छातीत घुसली व तिथेच त्यांनी आपल्या जीवनातील शेवटचा श्वास घेतला आणि वासंती सरमळकर यांची प्राणज्योत मालवली.

     या घटनेने संपूर्ण अणसूर गाव हादरून गेलय गावात सर्वत्र शोककळा पसरली. या प्रकरणाची पुढील कार्यवाही निसर्ग ओतारी, पोलीस निरीक्षक, वेंगुर्ला पोलीस ठाणे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed