
दिनांक: ४/१/२०२६
साटेली महापुरुष जत्रोत्सव
सातार्डा –
साटेली – खालचीवाडी ( गचकूळ ) येथील श्री महापुरुष देवाचा वार्षिक जत्रोत्सव बुधवार दि 7 जानेवारी होणार आहे. यानिमित्त सकाळी अभिषेक, ब्राह्मण भोजन होणार आहे. रात्री 10 वाजता पावणी होणार आहे. त्यानंतर पार्सेकर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन महापुरुष देवस्थान कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे.
