
दिनांक: २६ डिसेंबर २०२५
शिरोडा: शिरोडा येथे सार्वजनिक आरोग्य विभाग आणि जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागातील जनतेच्या सुदृढ आरोग्यासाठी कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅन द्वारे मोफत कर्करोग तपासणी व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या महत्त्वपूर्ण उपक्रमाचा शुभारंभ सोहळा आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्र रेडी कार्यक्षेत्रात आयोजित करण्यात आला होता. दिनांक २४ डिसेंबर २०२५ रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन शिरोडा ग्रामपंचायत सदस्य प्रथमेश उर्फ बड्या परब यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्यांच्यासोबत उपस्थित सोबत डॉक्टर विवेक कदम, वैदकीय अधिकारी रेडी., आरोग्य सहायक एस ए कळगुटकर. आरोग्य निरीक्षक बी एस कांबळी. आरोग्य सहायिका एस एम वारंग सर्व एनसीडी स्टाफ सर्व समुदाय आरोग्य अधीकारी सर्व सर्व आरोग्य सेविका, सर्व आरोग्य सेवक व इतर सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र कर्मचारी व सर्व आशा उपस्तित होते.कॅन्सर व्हॅन तपासणी पथकातील सर्व अधिकारी व कर्मचारी या कार्यक्रमात शिरोडा दशक्रोषितील नागरिकांचा सहभाग लाभला.
