आताच शेअर करा
फोटो
एड मेहमूद रखाजी

दिनांक: १६ डिसेंबर २०२५

बांदा: सावंतवाडी येथील अग्रगण्य संगणक प्रशिक्षण संस्था, एक्सेल कॉम्प्युटर अकॅडमीचे संचालक आणि संस्थापक असलेले अॅड. मेहमूद अब्दुललतिफ रखांगी यांना बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा, हायकोर्ट, मुंबई यांची सनद (प्रॅक्टिसिंग सर्टिफिकेट) प्राप्त झाली आहे.
      त्यांनी एल.एल.बी. (LLB) पदवी पूर्ण केली होती आणि आता ६ डिसेंबर २०२५ रोजी त्यांना ही महत्त्वपूर्ण सनद प्रदान करण्यात आली. सायबर क्षेत्रात प्रॅक्टिसवर भर
मेहमूद रखांगी हे गेले तीस वर्षांहून अधिक काळ संगणक (आयटी) क्षेत्रात कार्यरत आहेत. आता अॅडव्होकेट म्हणून ते आपली प्रॅक्टिस विशेषतः सायबर, सोशल मीडिया आणि डिजिटल क्राईम या क्षेत्रांत सुरू करण्याचा मानस बाळगून आहेत. यासाठी त्यांनी महाराष्ट्रातील नामांकित कॉलेज, गव्हर्न्मेंट लॉ कॉलेज, मुंबई  येथे संलग्नित असलेल्या डिप्लोमा इन सायबर लॉ या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे.
  या यशाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना अॅड. रखांगी यांनी सांगितले की, ते सामान्य नागरिक आणि प्रशासन यांना सेवाभावी उद्देशाने कायदेशीर सेवा देण्यास तत्पर राहतील. त्यांच्या या शैक्षणिक व व्यावसायिक प्रगतीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed