आताच शेअर करा
फोटो – मडूरा रवळनाथ

दिनांक: १४ डिसेंबर २०२५

बांदा (प्रतिनिधी) :

   मडूरा येथील श्री देव रवळनाथाचा वार्षिक जत्रोत्सव रविवार१४ डिसेंबर रोजी साजरा होत आहे. त्यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. सकाळी श्रींची विधीवत पूजाअर्चा, अभिषेक होईल. त्यानंतर देवाला केळी ठेवणे, नवस बोलणे व फेडणे हे कार्यक्रम होतील. रात्री देवीची तरांगकाठी वाजतगाजत माऊली मंदिरातून श्री रवळनाथ मंदिरात येईल. त्यानंतर रात्री श्रींची सवाद्य पालखी मिरवणूक व मध्यरात्री नाईक मोचेमाडकर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग  होणार आहे. भाविकांनी सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन मडूरा ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
——————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed