आताच शेअर करा

दिनांक: २३ नोव्हेंबर २०२५

नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी शहरात भारतीय जनता पक्षाची ताकद लक्षणीयरित्या वाढली आहे. युवा आणि आक्रमक नेते विशाल परब यांच्या नेतृत्वाखाली शहरातील दहाही प्रभागांतील शेकडो नागरिकांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. पक्षप्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्रीय नेतृत्वावर, राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (देवा भाऊ) आणि महाराष्ट्र भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण (रवी दादा) यांच्या विकासात्मक कार्यावर आणि धोरणांवर विश्वास ठेवून आम्ही भाजपमध्ये सामील होत आहोत.
या ऐतिहासिक पक्षप्रवेश सोहळ्यात बोलताना युवा नेते विशाल परब यांनी ठाम विश्वास व्यक्त केला की, सावंतवाडी नगरपरिषदेचा निकाल भाजपच्या बाजूनेच लागेल. भाजपवर प्रेम करणारी माणसं तळकोकणात आहेत, असे सांगून ते म्हणाले की, “भाजपचा कार्यकर्ता पेटून उठतो तेव्हा काय होतं, हे येणाऱ्या निकालात दिसून येईल.” सावंतवाडीच्या विकासाबाबत बोलताना परब यांनी आपली महत्त्वाकांक्षा व्यक्त केली. ते म्हणाले, “सावंतवाडीची स्पर्धा आता पुणे, बारामतीशी आहे. सावंतवाडीत राहून इथल्या लोकांची सेवा करणे हेच माझे ध्येय आहे.” त्याचबरोबर, त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर विरोधकांना थेट आव्हान देत म्हटले, “सावंतवाडी, वेंगुर्लेत चांगलं हॉस्पिटल आणावं, आम्ही तुमचे स्वागत करतो.”

विशाल परब यांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात शहरातील सर्व प्रभागांतील नागरिकांसह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. प्रवेश करणाऱ्यांमध्ये संतोष तळवणेकर, शिवा गावडे, ज्ञानेश्वर पारधी, निजान मुल्ला, नजमीन मुल्ला आदी प्रमुख कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

यावेळी माजी सभापती प्रमोद कामत आणि गुरूनाथ पेडणेकर यांनीही आपले मनोगत व्यक्त करत नवागत कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. या महत्त्वपूर्ण सोहळ्याला भाजप युवा नेते विशाल परब यांच्यासह माजी सभापती प्रमोद कामत, गुरूनाथ पेडणेकर, सौ. वेदीका परब, माजी नगरसेवक राजू बेग, दिपाली भालेकर, दिलीप भालेकर, केतन आजगावकर, अमित परब, हितेन नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed