
दिनांक:१ नोव्हेंबर २०२५
बांदा: आरती फाउंडेशन ट्रस्टला सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्यता मिळाली असून हि ट्रस्ट दिनांक ११ सप्टेंबर २०२५ रोजी उदयास आली आहे. सिंधुदुर्गातील सामाजिक ,शैक्षणिक ,सांस्कृतिक ,कला ,क्रीडा, कृषी ,आरोग्य ,पर्यटन असे सामाजिक उपक्रम राबवून बहुउद्देशीय कार्य करण्यासाठी आरती फाउंडेशन सिंधुदुर्ग (नोंदणी क्रमांक ई ००००९६८ सिंधुदुर्ग ) संस्था /ट्रस्ट स्थापन करण्यात आली आहे. समाजातील गरीब गरजू तसेच सर्व घटकांना सोबत घेऊन संस्था अविरतपणे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी काम करणार आहे .
या संस्थेला शासन मान्यता मिळाल्याने संस्थेचे अध्यक्ष श्री.सखाराम जनार्दन गवस यांनी सर्वांचे आभार मानले आहेत. तसेच संस्था स्थापन करण्यासाठी संपूर्ण मार्गदर्शन श्री अभय सुखाळी ( लेखापरीक्षक )धर्मदाय आयुक्त महाराष्ट्र यांचे सदस्य व श्री. कोकण व्हिजन न्यूज चे संपादक यश माधव यांचे सहकार्य लाभले आहे.
येणाऱ्या पुढील काळात ही संस्था सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेगवेगळे उपक्रम राबवून समाजात आरती फाउंडेशन ट्रस्टच्या माध्यमातून नवीन पाया घालून देईल. जनतेच्या हिताचं काम करेल असे आश्वासन ट्रस्टचे अध्यक्ष सखाराम जनार्दन गवस यांनी दिले आणि पुढील वाटचालीसाठी संस्थेला शुभेच्छा दिल्या आहेत. आई
