
दिनांक: ३१ ऑक्टोबर २०२५
सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले काही दिवस ओंकार हत्ती ने थैमान घातले आहे. जनतेच्या पिकांची नासधूस करून नुकसान केले आहे. हत्तीस जेल बंद करण्यास साठी आवश्यक त्या परवानग्या प्राप्त झाल्या आहेत.त्यामुळे येत्या दहा दिवसात ओंकारला पकडण्यात येईल. असे आश्वासन स्थानिक आमदार दीपक केसरकर यांनी दिली आहे.
पत्रकार परिषदेत बोलत असताना ओंकार हत्तीने केलेल्या नुकसानाची भरपाई देण्यात येईल तसे पुरावे आपण वनविभागाकडे दाखल करावे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यास खुद्द मुख्यमंत्र्यांनी सांगितले असून त्याचीही भरपाई लवकरात लवकर देण्यात येईल.
यावेळी आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, अशोक दळवी, दीपलक्ष्मी पडते, बाबू कुडतरकर, प्रेमानंद देसाई , क्लेटस फर्नांडिस, आदी उपस्थित होते.
