
दिनांक: ४ ऑक्टोबर २०२५
बांदा प्रतिनिधी: डोंगरपाल येथील गुणाजी गोपाळ गवस वय वर्षे ६८ यांचे आज सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. उद्या सकाळी१० वाजता त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.दोन दिवसांपूर्वी त्याच्यावर हाॅस्पिटल मध्ये उपचार करून घरी आणण्यात आले होते. गुणाजी गवस हे डोंगरपाल हायस्कूलचे विद्यमान खजिनदार,माऊली मंदिर डोंगरपाल देवस्थान कमिटी सदस्य, डोंगरपाल गावाच्या माऊली युवक मंडळाचे संस्थापक सचिव अशा अनेक पदावर त्यांनी काम केले होते तसेच सामाजिक कार्यातही ते नेहमी सक्रीय असत. कबड्डी व हॉलीबॉल या खेळातही त्यांचा एकेकाळी हातखंडा होता. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा,मुलगी, सुन,जावई, नातवंडे असा परिवार आहे.