आताच शेअर करा

दिनांक: १० ऑक्टोबर २०२५

बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर

बांदा: बांदा येथे आज सायकांळी पावणे पाच च्या वाजण्याच्या दरम्याने बांदा खेमराज हायस्कूल च्या कॅटीनमध्ये स्फोट झाल्याची घटना घडली. शाळा सुटल्यामुळे विद्यार्थी नसल्याने मोठी दुर्घटना टळली अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.सदरची घटनाही कॅटीनच्या छपरावरून गेलेल्या उच्चदाबाच्या विद्युत वाहीन्यामुळे झाल्याचा प्रथम दर्शनी दिसून  येत आहे..कॅटीनच्या छपरावर प्लॅस्टिक घातल्याने कडक उन्हामुळे प्लॅस्टिक तापले विद्युत वाहीन्या छपरापासुन अवघ्या पाच ते सहा इंचावर असल्याने प्लॅस्टिकने पेट घेतला. प्लॅस्टिक पेटल्याने स्फोट होऊन मोठे नूकसान झाले  आहे.स्फोट झाल्याची घटना घडताच बांदा पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजेंद्र पालवे,तलाठी फिरोज खान, मुख्याध्यापकश्री नंदु नाईक,संरपच प्रियांका नाईक, उपसरपंच आबा धारगळकर विज वितरण कंपनीचे करर्मचारी तात्काळ दाखल झाले. मदतीसाठी बांदा ग्रामसाथानी धाव घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *