
दिनांक: १३ ऑक्टोबर २०२५
सावंतवाडी: सावंतवाडी तालुक्यातील वेत्ये गावात कलेश्वर मंदिरा च्या बाजूला रामा गावकर यांच्या घरा शेजारील पाटात १२ फूट लांबीची मगर रेस्क्यू करून नैसर्गिक अधिवासात मुक्त केली. ही मगर अंदाजे पावणे दानशे किलो ची असावी अशी माहिती रेस्क्यू टीमचे बबन रेडकर यांनी दिली.गेले ही मगर गावकर यांच्या घरा शेजारील भागात वावर करत असताना दृष्टीस पडली. याची माहिती वनविभागास मिळताच वनविभागाच्या बबन रेडकर यांच्या रेस्क्यू टीमने लगचे घटनास्थळी धाव घेऊन सावधगिरीने पकडण्याची कामगिरी बजावली. नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. रेस्क्यू टीमचे बबन रेडकर म्हणाले की या कार्यासाठी आम्हाला गावातील नागरिकांनी बरेच सहकार्य केले. यावेळी वनविभागातील रेस्क्यू टीम सोबत गावातील लोक प्रतिनिधि व ग्रामस्थ उपस्थित होते.