
दिनांक: ४ ऑक्टोबर २०२५
बांदा प्रतिनिधी: वाफोली परिसरात चोरांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट वाढला असून घर फोडीसह गाड्यांनाही चोरांनी लक्ष केंद्रित केले आहे. काल रात्री अंधाराचा फायदा घेत चोरांनी उभ्या करून ठेवलेल्या डंपरच्या तीन बॅटऱ्या चोराने लंपास केल्या आहेत.बांदा दाणोली मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहने ये जा करत असतात.मात्र सर्रास चोऱ्या ह्या या मार्गालगत असलेल्या घर किंवा गाड्यांना चोरांनी लक्ष केले आहे.हल्लीच विलवडे येथे दोनवेळा घरफोडी करण्यात आली होती.मात्र चोरांना पोलिसांचा धाक उरला नसल्याचे यावेळी स्थानिकांनी मत व्यक्त केले आहे.या मार्गावरील अनेक गावात चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.तरी पोलिसांनी या मार्गावरी गस्त वाढवावी अशी नागरिकांची मागणी आहे.