
कास येथे सरपंच प्रवीण पंडित यांचा सत्कार करताना माजी आरोग्य सभापती प्रमोद कामत. बाजूस मान्यवर.
दिनांक: ४ ऑक्टोबर २०२५
बांदा प्रतिनिधी: कास सरपंच प्रवीण पंडित यांची नाळ गावाशी जुळलेली असल्यामुळे त्यांना यश मिळते. कास गावाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार. तसेच सरपंच पंडित यांच्या कारकिर्दीत आणखी एक पुरस्कार मिळावा अशी अपेक्षा माजी जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रमोद कामत यांनी व्यक्त केली.
कास गावाचे सरपंच प्रवीण पंडित यांना नुकताच राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार मिळाला असून यानिमित्ताने श्री देवी माऊली रंगमंच, कास येथे त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. मुंबई मंडळ कास व ग्रामस्थांच्या वतीने झालेल्या सत्कार सोहळ्याला व्यासपीठावर गुरुनाथ पेडणेकर, वाफोली उपसरपंच विनेश गवस, तंटामुक्ती समिती अध्यक्ष बाबू पंडित, मधुकर देसाई, श्याम सावंत, आत्माराम गावडे, प्रमोद पंडित, अर्जुन पंडित, जयवंत पंडित, गोपाळ पंडित, समीर किनळेकर, नेतर्डे ग्रामपंचायत सदस्य कैलास गवस, कास उपसरपंच श्रेया राणे, प्रमिला पंडित, पोलीस पाटील प्रशांत पंडित, शाळा कमिटीचे नीलेश राणे आदी मान्यवर उपस्थित होते.
या सोहळ्यात प्रवीण पंडित यांच्या आई प्रमिला अशोक पंडित यांचा देखील विशेष सत्कार करण्यात आला. प्रमोद पंडित, विनेश गवस, मधुकर देसाई व गुरुनाथ पेडणेकर यांनी विचार मांडले, तर सूत्रसंचालन नकुल पंडित व विशाल पंडित यांनी केले. शेवटी आभारप्रदर्शन पंडित यांनी मानले.
त्याच दिवशी राजकारण सोडेन:
प्रमोद कामत यांनी सांगितले की कास माऊली मंदिर परिसर काँक्रिट करण्याचे काम 26 जानेवारीपूर्वी पूर्ण करावे. यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार. समाजकारण करताना प्रामाणिकपणाचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की, “आजवर आपण एकही पैसा हरामाचा घेतलेला नाही. ज्यावेळी असा पैसा माझ्याकडे येईल त्याच दिवशी राजकारण सोडेन.”