
दिनांक: ११ ऑक्टोबर २०२५
बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर
बांदा: सालाबादप्रमाणे यंदाही येथील आमची वाडी देऊळवाडी यांच्या
वतीने नरक चतुर्थी निमित्त खुली व आमंत्रित नरकासुर वध स्पर्धा २०२५ आयोजित करण्यात आली आहे. रविवार दिनांक १९ ऑक्टोबर रोजी ही स्पर्धा पिंपळेश्वर मंदिर जवळ , बांदा येथे पार पडणार आहे.
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांसाठी आकर्षक बक्षिसांची सोय करण्यात आली असून प्रथम क्रमांकास १५,००० रुपये रोख तर द्वितीय क्रमांकास १०,००० रुपये रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच बांदा मर्यादित स्पर्धेस प्रथम क्रमांक ४,४४४ रुपये रोख
व द्वितीय क्रमांक 2,222 रूपये रोख पारितोषिक देण्यात येणार आहे.
यावर्षी खास प्रेक्षकांसाठी दिवाळी सेशल लकी ड्रॉचेही आयोजन
करण्यात आले असून यात प्रथम पारितोषिक– रिफ्रिजेरेटर, द्वितीय पारितोषिक – कूलर, तृतीय पारितोषिक इलेक्ट्रिक गिझर ठेवण्यात आले आहेत.
विशेष आकर्षण म्हणून स्थानिक
कलाकार प्रशांत सावंत हे जिवंत पुतळा साकारणार आहेत.
अधिक माहितीसाठी आशीष सावंत (मो.
7058322706) गौरांग साळगावकर (मो.
7058559216), देवेश वारंग (मो. 7057568486) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.