
दिनांक: ३ ऑक्टोबर २०२५
शिरोडा प्रतिनिधि: शिरोडा, वेळागर समुद्रात आज सायंकाळी ८ जण बुडाले असून रात्री उशिरापर्यंत स्थानिक मच्छीमारांचे सहकार्याने पोलिस पथकाकडून शोधकार्य सुरू होते.
सायंकाळी ७ वाजेपर्यत बुडालेल्या आठ जणांपैकी ४ जणांना शोधण्यात यश आले आहे. या चार पैकी एक मुलगा व २ महिलांचा मृत्यु झाला. असून एक मुलगीच जिवंत मिळाली. अजून चार जण समुद्रात अडकले. चारही पुरुष आहेत.अशी बातमी मिळते.जिवंत मुली वरती शिरोडा येथील जिल्हा उपरुग्णालयात उपचार चालू आहेत. दुर्दैवाने तीन जण मृत झाल्याचे घोषित करण्यात आले आहे.
उर्वरित चार जणांचा शोध सुरू आहे. बेपत्तामध्ये दोन चालक व अन्य दोन पुरुष आहेत.समुद्राला भरती आल्याने लाटांचा प्रवाह वाढला आहे तसेच काळोखही पडल्याने शोध कार्य करण्यास काहीसे कठीण होतं आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार कुडाळ येथील मणियार कुटुंबातील व त्यांच्या नात्यातील बेळगाव येथील काहीजण या दुर्घटनेत सापडल्याचे कळते.
कुडाळचे आमदार निलेश राणे घटनास्थळी लवकरच भेट देतील अशी माहिती सूत्रांकडून मिळते.