
सिंधुदूर्ग:संपादकीय
दिनांक :१९ जून २०२४
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पञकारीता करणाऱ्याच्या पञकाराच्या १० वी ,१२ वी पास तसेच पदवीधर, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मुलांचा सत्कार रविवार दि.७ जुलै, २०२४ रोजी बॅ.नाथ पै. सभागृह, नगरपरिषद, सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग येथे आयोजित केला आहे. या मुलांच्या गुणगौरव कार्यक्रमास मुंबई येथील सुप्रसिद्ध करिअर मार्गदर्शक व मोटिव्हेशन स्पीकर्स *प्रा.डाॅ. दिनेश गुप्ता सर* उपस्थित मुलांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच इतर शाळांतील १०० % गुण मिळवून यश संपादन प्राप्त विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
करीअर विषयक मार्गदर्शन व विद्यार्थी पालक यांना मार्गदर्शन मोफत करण्यात येईल. त्यासाठी नावनोंदणी आवश्यक आहे. या नंबरवर संपर्क करावा ९४०४४४५०१८, ९३०९९७८६८४ असे आवाहन व्हाईस ऑफ मिडिया सिंधुदुर्ग तर्फे करण्यात आले आहे.