आताच शेअर करा

दिनांक: ११ सप्टेंबर २०२५

सावंतवाडी: भारत सरकारच्या  ग्रामीण विकास मंत्रालय व बँक ऑफ इंडिया पुरस्कृत स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थान सिंधुदुर्ग (आरसेटी ) अंतर्गत ट्रॅव्हल्स आणि टुरिस्ट गाईड प्रशिक्षण दिनांक: २२ सप्टेंबर २०२५ रोजी  पासून आयोजित करण्यात आले आहे.१८ ते ५० वयोगटातील प्रशिक्षणार्थी आपली नावे नोंदवू शकतात ही नोंदणी दिनांक १९ नोव्हेंबर २०२५ पूर्वी आरसेटी कार्यालयात नोंदणी करावी. सदर प्रशिक्षण कालावधी दहा दिवसाचा असेल या प्रशिक्षणाचे वैशिष्ट्ये खालील प्रमाणे आहेत.
मोफत प्रशिक्षण ( स्किल अँड सॉफ्ट स्किल), चहा नाश्ता जेवणाची सोय मोफत, मोफत निवासी व्यवस्था, व्यवसायिक कौशल्य, तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन, मार्केटिंग (विपणन), व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण, आणि मुद्रा/CMEGP योजने अंतर्गत कर्जाची उपलब्धी. सदर प्रशिक्षण सकाळी ९:३० ते ५:३० पर्यंत असेल नाव नोंदणी वेळ १० ते ५:३० पर्यंत असेल.
वरील सर्व गोष्टी प्रशिक्षणामध्ये शिकवल्या जातील आणि आवश्कत असल्यास बँक ऑफ इंडिया कडून कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल,तरी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेऊन नवीन व्यवसाय सुरु करण्यास फायदा होईल आणि स्वावलंबी होण्यासाठी तुम्हाला मदत होईल तसेच स्थानिक रोजगार उपलब्ध होईल असे आवाहन बँक ऑफ इंडिया , ओटवने शाखेचे शाखा प्रबंधक श्री. लक्ष्मण बोधवड यांना केले आहे.अधिक माहितीसाठी व प्रशिक्षण नोंदणीसाठी बँक ऑफ इंडिया सिंधुदुर्ग आरसेटी कुडाळ येथे खालील नंबर वर संपर्क साधावा.
ऑफिस फोन नंबर ०२३६३ – २२२९८६
मोबाईल नंबर
श्री. वाय. टी. पाटकर. ८२७५३६४५३६
श्री. एस. आर. कासले.
९४०५८३०७५६ यांच्याशी संपर्क साधून अधिक माहिती घ्यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *