आताच शेअर करा

दिनांक: १० सप्टेंबर २०२५

बांदा प्रतिनिधी: अलीकडेच सिंधुदुर्गातील काजू बोर्ड कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.त्यामध्ये कुठल्याही शेतकऱ्यांचा विचार न करता सर्व राजकीय नेते आणि पुढारी यांना स्थान देण्यात आले आहे.या कार्यकारिणीत संचालक म्हणून आपले शेतकरी प्रतिनिधी असणे आवश्यक आहे.त्यासाठी काजू बोर्ड संचालक सन्माननीय डॉक्टर  परशुराम पाटील साहेब यांच्या कडे मागणी करून आपल्या शेतकऱ्यांना या कार्यकारिणीत संचालक म्हणून स्थान मिळवणे गरजेचे आहे. महाराष्ट्र सरकारने अवैद्य रित्या नेतेमंडळी आणि पुढारी यांना या काजू बोर्डावर स्थान देऊन शेतकरी वर्ग कमजोर करण्याचा प्रयत्न चालू केला आहे. अशा प्रयत्नाने प्रत्येक वर्षी प्रस्थापित होणारे काजू दर यांच्यावर कुठेतरी रोख लावावा आणि शेतकऱ्यांच्या मानेवर टांगती तलवार ठेवून आपल्या पोळ्या भाजून घ्यावे. यासाठी हे नेते मंडळी आणि पुढारी यांना काजू बोर्डाच्या कार्यकारणीवर घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्या हाणून पाडण्याचा प्रयत्न सरकारचा चालू आहे. त्यामुळे हा प्रयत्न सरकारला यशस्वी करू न देता त्यांच्या विरोधात ठामपणे शेतकऱ्यांनी उभे राहून आपला हक्क मिळवण्यासाठी निदान तीन ते चार शेतकरी आपल्या सोबत घेऊन या बैठकीत उपस्थित राहावे.
     शेतकऱ्यांनी आज जर या गोष्टीवर दुर्लक्ष केला  हे राजकीय नेते आणि पुढारी जे ठरवतील ते भविष्यात आपल्याला मान्य करावे लागणार.तरी या गांभीर्याचा विचार करून सर्वांनी आपापल्या परीने जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या बैठकीत आणण्याचा प्रयत्न करावा. शेतकऱ्यांनी गुरुवार दिनांक ११ सप्टेंबर २०२५ संध्याकाळी  ३ वाजता बांदा गाडगेवाडी येथे दूध संस्था कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली. त्या बैठकीत सहभाग घ्यावा. ही  बैठक यशस्वी करून  काजू बोर्ड कार्यकारणीत  आपले शेतकरी बांधव देण्यासाठी किमान शेतकऱ्याने व सभासदाने  ३ ते  ४ तरी शेतकरी आणावे आणि बैठक यशस्वी पार पाडावी.सिंधुदुर्गातील सर्व  फळ बागायतदार शेतकऱ्यांनी आणि संघाने एकत्र येऊन शेतकऱ्यावर अन्याय करणाऱ्या सरकारला त्याची  जागा दाखूया. हि बैठक शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन एकजुटीने शेतकऱ्यांनी लढा द्यावा असे आवाहन रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *