आताच शेअर करा

दिनांक: ९ सप्टेंबर २०२५

तळवणे प्रतिनिधी: शंकर गावडे

वेंगुर्ला तालुक्यातील आडेली भंडारवाडी येथील असलेल्या ओढ्यातील  साडे सात फुटाची मगर पकडण्यात वनविभागाला यश आले असून यात सुगंध मयेकर या शाळकरी मुलाने  मोठी भूमिका बजावली आहे.

     सुगंध मयेकर हा विद्यार्थी सायंकाळी साडेचार पावणे पाचच्या दरम्यान  शाळा सुटल्यावर हा मुलगा घरी जात असताना त्याची नजर ओढ्यात असलेल्या  भल्या  मोठ्या मगरीवर पडली तरीही तो न घाबरता न डगमगता आपले धाडस दाखवत ही बातमी गावातील गावकऱ्यापर्यंत पोहोचवली. त्यानंतर ही बातमी गावभर अगदी वाऱ्याच्या वेगाने पसरली. व गावात एकच खळबळ उडाली. ही बातमी कुडाळ येथील वनखात्याच्या बचाव मोहिमेला देण्यात आली. काही क्षणात वन खात्याचे पथक तिथे हजर झाले. अथक प्रयत्न केल्यानंतर शेवटी त्या मगरीला पकडण्यात वनविभागाला यश प्राप्त झाले व गावातील लोकांनी सुटकेच्या निःश्वास सोडला.

     या बचाव मोहिमेमध्ये वनक्षेत्रपाल अनिल गावडे, दिवाकर बांबार्डेकर प्रसाद गावडे आणि वैभव अमृसकर हे वन अधिकारी सामील झालेले होते. तसेच गावातील ज्ञानेश्वर मुंडये, लवू दाभोलकर,  पिंट्या होडावडेकर,  अर्जुन मुंडये, सुधीर मुंडये त्याचबरोबर अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

    वनविभागाने या मगरीला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडणार असल्याचे सांगितले आहे. गावातील सर्व गावकऱ्यांनी वनविभागाच्या सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानले व यशस्वी कामगिरी केल्याबद्दल वन विभागाच्या बचाव पथकाचे  कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *