
दिनांक ९ सप्टेंबर २०२५
बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर
बांदा ग्रामपंचायत ची १५ ऑगस्ट रोजी असलेली व तहकूब झालेली ग्रामसभा आज मंगळवार दिनांक ९ सप्टेंबर रोजी पार पडली यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. आज मंगळवार असल्याने व बाजार बंद असल्याने मोठ्या संख्येने व्यापारी देखील उपस्थित होते यावेळी गावाच्या विकासाच्या दिशेने विविध मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. यावेळी गटार साफसफाई, वीज व अतिक्रमण या विषयावरून ग्रामस्थ आक्रमक झालेले पाहायला मिळाले. तसेच आळवडा येथील संडास या मुद्द्यावरून शाब्दिक बाचाबाची देखील पाहायला मिळाली. सर्वेश गोवेकर यांनी मुख्य बाजारपेठेतील टॉयलेट व पार्किंगची समस्या मांडली तसेच त्यावर उपाय देखील सुचवले. यावेळी सरपंच प्रियांका नाईक यांनी सर्व प्रश्नाची दखल घेऊन त्यावर कार्यवाही करण्यात येईल.अतिक्रमण बाबतीत ग्रामस्थ व व्यापारी वर्गाकडून सुद्धा सहकार्य अपेक्षित असल्याचे सांगितले. यावेळी उपसरपंच आबा धारगळकर व इतर सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.