
दिनांक: ६ सप्टेंबर २०२५
(गोवा) कोरगाव प्रतिनिधि: बरेच दिवस निवेदनाच्या माध्यमातून केरी गावात कदंबा बस सेवा सुरू व्हावी अशी मागणी करण्यात आली होती. प्रलंबित राहिलेली मागणी केरी-पेडणे येथून बांबोळी पर्यंतची नवीन कदंबा बससेवा आज सुरू करण्यात आली.
अगोदर ही सेवा खाजगी स्वरूपात लोकल ट्रान्सपोर्ट कंपन्या गोव्यात गाड्या चालवत होत्या.विशेष करून पत्रा देवी आणि केरी या ठिकाणी प्रत्येक दहा मिनिटांनी या गाड्या धावत असत पण कोरोनाच्या काळात या खाजगी ट्रान्सपोर्ट कंपन्यांचा धंदा कमी होऊ लागल्याने त्यांनी ही सेवा बंद केली तेव्हा पासून केरी परिसरात बस अभावी दळण वळणाचे जनजीवन विस्कळीत झाले होते.
त्यामुळे विशेषतः शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच जेष्ठ नागरिकांची गैरसोय होत होती. ही समस्या जाणून घेऊन ही बससेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या बससेवेचा शुभारंभ मांद्रेचे आमदार जित आरोलकर यांच्या हस्ते झाला. यावेळी केरी-पेडणे पंचायत सरपंच, पंच सदस्य आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.