आताच शेअर करा

बांदा प्रतिनिधि: संकेत वेंगुर्लेकर 

दिनांक : १५ जून २०२४


बांदा येथील व्ही.एन.नाबर मेमोरियल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये नवीन विद्यार्थ्यांचे औक्षण करून  सर्व शिक्षकांनी स्वागत केले व नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात केली.

नंतर शाळेच्या मुख्यध्यापिका सौ.मनाली देसाई यांनी औक्षण करून व खाऊ देऊन विद्यार्थ्यांचे  सर्व शिक्षकांसह स्वागत केले. विद्यार्थ्यांनी सरस्वती मातेला नमन करून वर्गात प्रवेश केला.
शाळेचे चेअरमन श्री.मंगेश कामत व स्कूल गव्हर्नरनींग कमिटीने ह्या शैक्षणिक वर्षासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *