आताच शेअर करा

दिनांक: १२ जुलै २०२५

बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर
      रोटरी क्लब ऑफ बांदा च्या रोटरी वर्ष २०२५-२६ साठीच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ मंगळवार, दि. १५ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता श्री स्वामी समर्थ हॉल, दोडामार्ग रोड, बांदा येथे पार पडणार आहे. रोटरी क्लब ऑफ बांदा च्या अध्यक्षपदी रो. शिवानंद बा. भिडे, सचिवपदी रो. स्वप्नील एस. धामापुरकर, तर खजिनदारपदी रो. सुदन आर. केसरकर यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती मावळते अध्यक्ष रो. सीताराम गावडे यांनी दिली. कार्यक्रमासाठी इन्स्टॉलिंग ऑफिसर म्हणून रो. अमित न. माटे (D.S – DCC RDC कोऑर्डिनेशन) हे उपस्थित राहणार आहेत. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लब ऑफ बांदा चे A.G रो. डॉ. विनया बाड, G.A.A डॉ. विद्याधर तायशेटे, तसेच D.S for Polio and WGM रो. राजेश घाटवळ हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील सर्व रोटरी पदाधिकारी व रोटरी सदस्य हेही या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. समाजातील गरजू आणि वंचितांसाठी रोटरी क्लब ऑफ बांदा नेहमीच सहकार्याची भावना जपत समाजोपयोगी कार्य करीत राहील. या कार्यात सर्व बांदावासियांनी सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन मावळते अध्यक्ष रो. सीताराम गावडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed