आताच शेअर करा

बांदा प्रतिनिधी:संकेत वेंगुर्लेकर 

दिनांक :८ जून २०२४

बांदा दाणोली जिल्हा मार्गावर वाफोली डोंगरीकर हाँटेल जवळ उतार व वळणावर दोन वाहनां मध्ये समोरा समोर भीषण अपघात झाला. धडकेत दोन्ही वाहनांच्या दर्शनी भागाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. यामध्ये माल वाहक ट्रकचा चालक किरकोळ जखमी झाला. त्याला बांदा प्राथमिक उपकेद्रांत उपचार करुन घरी पाटविण्यात आल्याचे वैद्यकिय अधिकारी डाँ.गजानन सारंग यांनी सांगितले. हा अपघात शनिवारी पहाटेच्या सुमारास घडला. याबाबत सायंकाळी बांदा पोलिसांत अपघातीची नोंद करण्याची  प्रकिया सुरु होती.

      या मार्गावर दोन्ही बाजूस झाडेझुडपे वाढलेली आहे. वळणारवर समोरुन येणारे वाहणे पण दिसत नाही. कोकणात सद्या मुसळधार पाऊस सुरु आहे.  रस्त्याच्या बाजूची झाडे झुडपे साफसफाई होणे गरजेचे आहे. हा अपघात पुर्णत: बांधकाम विभागाच्या बेजबाबदार पणा असल्याचा अारोप सरपंच प्रकाश दळवी यांनी केला आहे.

        बांदा दाणोली जिल्हामार्गावर अपघाताचे  सत्र सुरु आहे. काही ठिकाणी रस्ता अरुंद आणि वेडीवाकडी वळणाचा आहे.  दाणोली,सातोळी-बाळवाट,सरमळे, विलवडे वाफोली,बांदा हया सहा गाव,अनेक शाळा रस्त्या लगत आहे. कोल्हापुर,पुणे,बेळगाव, गोव्यात जाणारे पर्यटक याच जवळच्या मार्गांचा प्रथम प्राधान्य देतात. या मार्गावर उतार व वळणावर रस्त्याचा अंदाज न आल्याने बरेच अपघात झाले आहे. सदर रस्त्यांचे खड्डेमुक्त झाल्याने वाहन चालक सुसाट वेगात जात आहेत. या मार्गावर दिशादर्शक व वेग मर्यादा  फलक लावणे गरजेचे आहे.काही रस्ता अरुंद व वळणावळणाचा आहे. यांचाही संबधित विभागाने रस्त्याचा सर्वे करणे गरजेचे आहे. यापुढे जिवितहानी,नुकसान झाल्यास संबधित विभाग जबाबदार राहील. संबधित विभागाने गणेश चतुर्थी पुर्वी दखल न घेतल्यास माजी पंचायत समिती सदस्य संदिप गावडे यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडी बांधकाम विभाग कार्यालयत धडक देणार असा ईशारा  विलवडे सरपंच प्रकाश दळवी यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *