
दिनांक: २६ जून २०२५
न्हावेली / वार्ताहर
श्री देवी सातेरी भद्रकाली आरोंदा येथे ग्रामस्थ आयोजित सोमवार ३० जून रोजी रात्री ७.३० वाजता “ अहंकार दक्षाचा विवाह शिवशक्तीचा “ हा संयुक्त दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे.
यामध्ये सहभागी कलाकार गणपती शंकर दत्तप्रसाद शेणई,सती सुघीर तांडेल,दक्ष मोरेश्वर सावंत,प्रसुती शिवप्रसाद मेस्री,नारद चारुहास मांजरेकर,अंगीरा ऋृषी सागर गावकर,दधिषी ऋृषी गौरव शिर्के,तारकासूर प्रशांत मयेकर,जटा उदय मोर्ये,मायावी कृत्या सुयश ठाकूर,सदभिष महेंद्र कुडव,सेवक संदेश वेंगुर्लेकर तसेच संगीतसाथ हार्मोनियम संकेत कुडव,पखवाज पियुष खांदारे,तालरक्षक विनायक सावंत यांचा समावेश आहे.
