आताच शेअर करा
ऍडव्होकेट: अभय सुकाळी

दिनांक: २६ जून २०२५

सिंधुदुर्ग: संपादकीय

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धर्मदाय आयुक्त कार्यालयात लेखापरीक्षक (ऑडिटर) या पदावर कार्यरत असलेले श्री. अभय अशोक सुकाळी हे आताच एल एल बी परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांनी
आपल्या आयुष्यात अजून एक पदवी मिळवली आहे. ह्या अगोदर त्यांनी बी. कॉम,  एम. कॉम, जी. डी. सी. ए. अशा पदव्या मिळवल्या होत्या.
सुकाळी हे सिंधुदुर्ग जिल्हा मालवण तालुक्यातील कर्लाचाव्हाळ या गावाचे असून सर्वसाधारण घराण्यामधून आपले  जीवन व्यथित करत आहे. आपल्या आयुष्यात अथक प्रयत्न करून त्यांनी हया सर्व पदव्या मिळवल्या आहेत. कोकण व्हिजन न्यूज च्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले अतिशय खडतर आयुष्यात जीवन प्रवास केला. पण शिक्षणाला महत्व देत पुढे शिकत राहिलो. शिक्षण घेत असताना कधी मागे वळून पाहिले नाही. आई वडील गरीब असले तरी त्यांनी पदोपदी योग्य ते सहकार्य केले. त्यांच्या आशीर्वादाने आज हे शिक्षणाचे आव्हान पेलू शकलो. पुढील आयुष्यातही शिक्षणाची कास धरून पुढे जायचे आहे. पुढे ते असेही म्हणाले की माणसाच्या आयुष्यात जिद्द नावाची दैविक शक्ती आहे आणि ती आचरणात आणल्यास माणूस जिद्दीच्या जोरावर आयुष्यात काही करू शकतो. हे सद्या मी माझ्या आयुष्यात अनुभवले आहे. हया शिक्षणाच्या जोरावर अजूनही बऱ्याच पदव्या, हुद्दे  मिळवण्याची माझी इच्छा आहे. शिक्षणाच्या जोरावर बरंच काही करता येते असेही  अभय सुकळी पुढे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed