आताच शेअर करा

दिनांक: २५ जून २०२५

बांदा प्रतिनिधि: येथील पीएम श्री केंद्रशाळेत पहिलीत शिकणाऱ्या चिमुकल्यावर भटक्या कुत्र्याने हल्ला केला. यात त्याचा ठिकठिकाणी चावा घेतल्यामुळे तो जखमी झाला आहे. ही घटना आज सकाळी घडली. दरम्यान त्याला ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते ओंकार नाडकर्णी, साई करमळकर यांनी तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. शाळा व्यवस्थापन व शिक्षकांच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप नाडकर्णी यांनी केला आहे. तसेच या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी त्यांनी दिली आहे.
      शाळा सुरू असताना विद्यार्थी हा मुख्य गेट उघडून बाहेर गेलाच कसा? असा सवाल नाडकर्णी यांनी उपस्थित केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, या विद्यार्थ्यावर कुत्र्यांनी हल्ला करून चावा घेतल्याने तो रडत उभा होता. याची माहिती ओंकार नाडकर्णी व साई करमळकर यांना मिळाल्यानंतर त्यांनी त्याला उपचारासाठी बांदा आरोग्य केंद्रात दाखल केले. त्याठिकाणी उपचार करून त्याला अधिक उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. श्री नाडकर्णी यांनी या घटनेबाबत नाराजी व्यक्त करत शाळेच्या वेळेत विद्यार्थी बाहेर गेलाच कसा तसेच याबाबत शिक्षकांना कोणतीही कल्पना नसल्याने आश्चर्य व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed