आताच शेअर करा

दिनांक: १८ जून २०२५



सावंतवाडी:सावंतवाडी मतदार संघाचे लाडके आमदार  श्री दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी वैदिक धर्म संस्थान व दि आर्ट ऑफ लिविंग सिंधुदुर्ग यांच्यावतीने आयोजित तब्बल एक हजार वर्षानंतर प्रथमच सिंधुदुर्ग नगरीत “मूळ सोमनाथ ज्योतिर्लिंग रुद्र पूजा व दर्शन सोहळा” आमदार दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आला होता. सकाळी नऊ ते दहा वाजेपर्यंत रुद्र पूजा आयोजित करण्यात आली होती. तसेच दहा ते बारा वाजेपर्यंत दर्शन सोहळा ठेवण्यात आला होता. ह्या  सोमनाथ मंदिरातील ज्योतिर्लिंगाची आख्यायिका फार वेगळी आहे.भारतामध्ये बारा ज्योतिर्लिंग आहेत त्यात सौराष्ट्राच्या ज्योतिर्लिंगाचे पहिले नाव येते.सोमनाथ मंदिरातील  शिवलिंगाला फार मोठे महत्व आहे.हे जमिनीपासून दोन फुटावर उंच तरंगत होते त्याला भूमीचा स्पर्श होत नसे असे हवेत तरंगत असणाऱ्या लिंगाचे १०२० ते १०२४ च्या काळात मोहम्मद गजनीने सोमनाथ मंदिरावर आक्रमण केले आणि येथील सोने, चांदी मूल्यवान वस्तू लुटले.  नंतर तेथील शिवलिंगाचे तुकडे केले. तेथील   काही अग्निहोत्री लोकांनी ते तुकडे गोळा करून दक्षिण भारतात घेऊन गेले. तेथे त्यांनी त्या शिवलिंगाच्या तुकड्यांचे पुन्हा छोटे छोटे शिवलिंग तयार केले. वैज्ञानिकांच्या दृष्टीने ह्या शिवलिंग लोह म्हणजे लोखंडाचे प्रमाण कमी असलेले आणि दुसऱ्या दुनियेतून आपल्या पृथ्वीवर अवतरलेले असे एकमेव शिवलिंग  होते.या शिवलिंगाच्या  तुकड्यापासून बनवलेल्या शिवलिंगाचे आज सावंतवाडी शहरातील आमदार दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी पूजन झाले.या दर्शन सोहळ्यात पंडित दर्शन हाती, पंडित अतुल द्विवेदी आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते. त्याचबरोबर आर्ट ऑफ लिविंग प्रशिक्षक: आनंद पोयेकर, उमेश वायंगणकर, संदीप नारकर, हर्षल नाडकर्णी, दीपा सावंत, सुचित्रा बांदेकर, अनिता धुरी आदी उपस्थित होते. त्याचबरोबर इतरही भाविकांनी या सोहळ्याचे दर्शन घेऊन आनंद लुटला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed