
दिनांक: १६ जून २०२५
बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर
जिद्द व चिकाटीच्या जोरावर विद्यार्थ्यांनी आपलं यश संपादन करून जीवनात यशस्वी झाले पाहिजे आजच्या शैक्षणिक स्पर्धेत टिकण्यासाठी कठोर परिश्रम व मेहनत घेतली पाहिजे आज शिक्षणासाठी अनेक पर्याय तुमच्यासमोर उपलब्ध आहेत याचं संधीचा फायदा घेत आपण पुढील शैक्षणिक जीवनात यशस्वी व्हाल असे मत रोटरी क्लब बांदा चे अध्यक्ष सिताराम गावडे यांनी बांदा मराठा समाज विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. ज्या विद्यार्थ्यांची पुढील शिक्षण घेण्यासाठी आर्थिक परिस्थिती बेताची असेल त्यांना सुद्धा शैक्षणिक कर्ज सुविधा आज उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे उद्योग सुरू करणाऱ्या युवकांना सुद्धा व्यावसायिक कर्ज सुविधा आहेत यासाठी आपण केव्हाही सहकार्य करण्यास तत्पर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.श्री. सिताराम गावडे, उद्योजक नारायण गावडे, उद्योजक आनंद गवस, देवस्थान समिती बांदा अध्यक्ष राजाराम उर्फ बाळू सावंत,बांदा मराठा समाज मुख्य प्रवर्तक गुरूनाथ सावंत, मराठा समाज माजी सचिव म.गो.सावंत, माजी सरपंच दिपक सावंत, महीला मराठा अध्यक्ष स्वाती सावंत, बांदा मराठा समाज अध्यक्ष विराज परब, आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी बांदा मराठा समाज भुषण पुरस्कार यशस्वी उद्योजक नारायण गावडे व यशस्वी उद्योजिका सौ.अक्षता आनंद गवस यांना मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र देऊन प्रदान करण्यात आले. तसेच यावर्षी पत्रकार संघाचे पुरस्कार प्राप्त पत्रकार प्रविण परब, विश्वनाथ नाईक, अजित दळवी यांना सुद्धा बांदा मराठा समाज यांच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
सत्काराला उत्तर देताना नारायण गावडे म्हणाले मी सुरुवातीला व्यवसाय सुरू करण्यासाठी खुप मेहनत घेतली. शेजारच्या गोवा राज्यांत एस.टी ने प्रवास करत व्यवसायासाठी खुप प्रयत्न केला पण जिद्द सोडली नाही. घरात व्यावसाची अशी कोणतीच पार्श्वभूमी नव्हती तसेच घरची परिस्थिती बेताची होती याच परिस्थितीमधून मार्गक्रमण करून मी आज या यशापर्यंत पोहचलो उपस्थित विद्यार्थ्यांना संदेश देत तुम्ही सुद्धा तुमच्या पुढील जीवनात कठोर परिश्रम घ्याल तर नक्कीच यशस्वी व्हाल असे मत स्पष्ट केले.
यशस्वी उद्योजिका अक्षता गवस यांनी सुद्धा आपल्या मनोगतातून सांगितले की मला पुढे जाण्यास खरा पाठींबा दिला तो आपल्या पती ने अनेकदा त्यांचा सल्ला घेऊन मी त्यांना त्यांच्या व्यवसायात मदत करत होती. आणि आज मी स्वतः व्यवसाय या अनुभवातून चालवत आहे. मराठा समाज्याने दिलेल्या पुरस्काराबद्दल त्यांनी मंडळाचे बोलताना आभार व्यक्त केले.
मराठा समाज माजी अध्यक्ष राजाराम उर्फ बाळू सावंत यांनी सांगितले की गेली अनेक वर्षे बांदा मराठा समाज अनेक उपक्रम मराठा समाजासाठी राबवत आहे. यामध्ये क्रांती मोर्चा यशस्वी सहभागी, पुरग्रस्तांसाठी मदत, मराठा दाखला, आरोग्य शिबीर, विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम असे अनेक उपक्रम आम्ही मंडळाच्या वतीने करत आहोत. यावर्षी दहावी ,बारावी यशस्वी विद्यार्थ्यांसाठी गुणगौरव कार्यक्रम छान पद्धतीने आयोजित केला आहे. विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी सावंत यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या पंचक्रोशीतील हायस्कूल मधील पहीले तीन क्रमांक,नव्वद टक्के मिळालेले विद्यार्थी, यांना भेटवस्तू, गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले. तसेच विशेष पदवी प्राप्त एम.बी.बी.एस. मानसी सावंत, बी.एच.एम.एस. मिताली सावंत,मास्टर डिग्री आर्यलॅंड युनिव्हर्सिटी प्राप्त अंकीता पंडित, एम.एस.सी.गोल्ड अंजली सावंत, यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना कोकण कला व शिक्षण विकास संस्थेकडून स्कूल किटसाठी सहकार्य लाभले. गौरवण्यात आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये इयत्ता दहावी आर्यन गावडे, तन्वी टीकार, श्रेया सावंत, लक्ष्मण सावंत, आर्या सावंत, संस्कृती गवस, शर्वरी ठाकूर, सृष्टी ठाकूर, भावेश देसाई, संचिता गवस,ओम परब, श्रेयस दळवी, रेश्मा पालव, जितेश पोपकर, भ्रुंजल गावडे, सोहम गावडे, वैष्णवी वाडकर, रिधिमा गावकर, आर्या मुळीक, श्रीशा सावंत, कृपा वारंग, श्रद्धा गावडे, गीतांजली देसाई,दत्ताराम भिसे, वैष्णवी गवस, हर्षद राणे, रिद्धी मडुरकर, श्रावणी गावडे, पूजा सावंत, संचिता सावंत,अदिती परब, इयत्ता बारावी गौरी नाईक,कस्तुरी सावंत, तनिष्का सावंत, मानसी देसाई, मयुरी गावडे, तनुजा देसाई,शर्वा मोरजकर, महिमा सावंत, श्रीधर कोठावळे, राखी पंडित, सदाशिव गावडे, रोहन दळवी, प्रथमेश शेगडे गौतमी मुळीक, रुचिता सावंत, वेदांग वारंग, अथर्व राणे, चारुशीला कानसे,
यावेळी सचिव आनंद वसकर, सहसचिव हेमंत मोर्ये, खजिनदार महेश मोर्ये, माजी अध्यक्ष निलेश मोरजकर, श्याम गवस, लवू रेडकर, ग्रा.सद-य रत्नाकर आगलावे, बांदा मराठा प्रसिद्धी प्रमुख राकेश परब,विकि कदम,माधवी गाड, राखी कळंगुटकर,ममता सावंत,अवंतिका पंडीत,लता रेडकर, स्मिता परब,सुचिता धुरी,निलेश कदम, अशोक परब,आदी पदाधिकारी व मराठा बांधव उपस्थित होते.
विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमाचे सविस्तर वाचन सहसचिव हेमंत मोर्ये, सन्मानपत्र वाचन माधवी गाड, कार्यक्रमाचे सुत्रसंचलन राकेश परब तर आभार सौ. ममता सावंत यांनी मानले.
