
दिनांक: १२ जून २०२५
सावंतवाडी: जागतिक रक्तदाता दिनाचे (१४ जून) औचित्य साधून ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग समवेत सावंतवाडी तालुका पत्रकार संघ आणि रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. १५ जून २०२५ रोजी सकाळी ९:०० ते दुपारी १:०० या वेळेत रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी, यांचे कार्यालय, साधले मेससमोर, सावंतवाडी येथे रक्तदान शिबिराचे त्याचप्रमाणे रक्तदाता सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे._
रक्तदानासारखे पुण्यकर्म करताना एखादा रक्तदाता ज्यावेळी रक्तदान करतो, त्या एका वेळी तो रक्तदाता पीसीव्ही, प्लेटलेट्स किंवा प्लाझ्मा च्या माध्यमातून तीन-तीन रुग्णांचे प्राण वाचवीत असतो. तरी हे पुण्यकर्म आपल्या हातून घडावे, याकरिता या रक्तदान शिबिरात जास्तीतजास्त रक्तदात्यांनी रक्तदान करावे, तसेच रक्तदान करु इच्छिणाऱ्या रक्तदात्यांनी ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्गचे अध्यक्ष दयानंदजी गवस सर, रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीचे अध्यक्ष प्रमोद भागवत, सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन रेडकर, सचिव विजय राऊत, खजिनदार रामचंद्र कुडाळकर, सदस्य दीपक गावकर, ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्गच्या उपाध्यक्षा मीनल सावंत, कार्याध्यक्ष महेश रेमुळकर, खजिनदार सिद्धार्थ पराडकर, सदस्य दिनेश गावडे, मंगेश माणगावकर, सचिव बाबली गवंडे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग तसेच सावंतवाडी तालुका पत्रकार संघ आणि रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी यांनी केले आहे.
