आताच शेअर करा
बांदा नट वाचनालयात आयोजित शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी उपस्थित असलेले मान्यवर.

दिनांक: ७ जून २०२५

बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर


     महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिन सोहळा येथील नट वाचनालयात साजरा करण्यात आला.
   यावेळी आयोजीत कार्यक्रमात छत्रपतींच्या प्रतीमेस वाचनालयाचे संचालक सुधीर साटेलकर यांनी पुष्पहार  अर्पण केला. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष एस. आर. सावंत यांनी दिप प्रज्वलीत करुन कार्यक्रमाला सुरूवात केली.
    ज्येष्ठ विचारवंत अनंत भाटे यांनी राज्याभिषेक सोहळ्या बाबत आपले विचार मांडले. या कार्यक्रमाला सचिव राकेश केसरकर, संचालक जगन्नाथ सातोसकर, अभिजीत पोरे, तेजस शेटकर, सौ. अर्चना सावंत, श्री स्वराज्य प्रतिष्ठानचे संकेत वेंगुर्लेकर, नैतीक मोरजकर, नारायण बांदेकर, सुर्याजी देसाई, शुभम बांदेकर, वेदिका गावडे, ग्रंथपाल सौ. सुस्मीता नाईक, सहाय्यक ग्रंथपाल सुनील नातू, सौ. अमीता परब, ओंकार राऊळ आदी उपस्थित होते.
     या दिनानिमित्त छतपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रम व जीवनावर लिहीलेल्या विविध लेखन साहीत्याचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राकेश केसरकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *