आताच शेअर करा

दिनांक: ५ जून २०२५


          सावंतवाडी:   काल बुधवारी दि. ०४ जून २०२५ रोजी गोवा मेडिकल कॉलेज, बांबोळी (GMC) येथे केवळ एक दिवसाच्या बाळाची स्थिती अत्यंत नाजूक बनल्याने त्या बाळाला किमान तीन युनिट फ्रेश रक्ताच्या तेही दुर्मिळ अशा ओ निगेटिव्ह रक्ताची तातडीची गरज भासली होती. दिवसभरात दोन रक्तदाते भेटले होते, परंतु कसेही करुन अजून एक रक्तदाता अत्यावश्यक होता.
         सरतेशेवटी संध्याकाळी साडेपाच वाजता GMC रक्तपेढीमधील एका डॉक्टरांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आमच्या ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे नियमित ऑन कॉल रक्तदाते रसिकजी दळवी (आरोस) यांच्याशी संपर्क साधताच रसिकजींनी संस्थेचे सचिव बाबली गवंडे यांना याविषयी माहिती देऊन केवळ अर्ध्या तासात GMC रक्तपेढीमध्ये जाऊन अमृततुल्य असे रक्तदान करुन त्या नवजात बाळाचा जीव वाचविला.
         रसिकजी, आपल्या या अतुलनीय कार्यकर्तृत्वाला ऑन कॉल रक्तदाते संस्थेच्या वतीने मानाचा मुजरा.
         नातेवाईकांनी सुद्धा अश्रूपूर्ण नयनांनी रसिकजी दळवी यांचे पुनःपुन्हा आभार मानले.
       ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे असे अनेक रक्तदाते आहेत, जे रक्ताच्या गरजेची पोस्ट संस्थेच्या समूहावर येताच क्षणाचाही विलंब न करता ताबडतोब रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान करतात आणि पेशंटचा बहुमूल्य जीव वाचवितात. अशा रक्तदात्यांप्रती संस्थेला सार्थ अभिमान असल्याचे संस्थेचे अध्यक्ष दयानंदजी गवस सर यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *