
दिनांक: १९ मे २०२५
दोडामार्ग भेडशी प्रतिनिधी: गौरी नाईक
आंबेली येथे दिनांक २२ मे रोजी श्री देवी सातेरी सिद्धनाथ देवाचा चौदावा वर्धापन दिन साजरा होत आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी: १०: ००सर्व देवतावर महाअभिषेक ,११:०० वाजता श्री सत्यनारायण पूजा, महाआरती, तीर्थप्रसाद, दुपारी महाप्रसाद , संध्याकाळी स्थानिकांचे सुश्राव्य भजन आणि रात्री ठीक ९:३० वाजता जय हनुमान पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ दाडेली आरोस यांचा ट्रिकसीनयुक्त नाट्यप्रयोग होणार आहे तरी भाविकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन आंबेली देवस्थान कमिटी व ग्रामस्थ मंडळाकडून करण्यात आले आहे.
