आताच शेअर करा

दिनांक: १३ मे २०२५

सातार्डा प्रतिनिधि: संदीप कवठणकर

दिनांक १४ व  १५ मे रोजी श्री देवी माऊली पंचायतनाचा वर्धापन दिन साजरा होत आहे. या सोहळ्या निमित्त विविध कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यात आली आहे.
सकाळी ९:०० वाजता श्री देवी माऊली पंचायतनावर अभिषेक, दुपारी १२: ००वाजता महाआरती आणि तीर्थप्रसाद संध्याकाळी ७ वाजता स्थानिक मुला व मुलीचे कार्यक्रम गुरुवार दिनांक १५ मे रोजी सकाळी अभिषेक, ९:०० वाजता सत्यनारायण पूजा, दुपारी  महाआरती तीर्थप्रसाद व महाप्रसाद, ४ वाजता स्थानिकांची भजने, ५ वाजता महिला फुगडीचा कार्यक्रम, संध्याकाळी ७ वाजता दीपोत्सव व पालखी प्रदीक्षणा, रात्री १०:०० वाजता वालावलकर दशावतारचा दणदणीत नाट्य प्रयोग होणार आहे तरी सर्व भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आवाहन श्री देवी माऊली पंचायतन देवस्थान सातोसे व ग्रमस्थांकडून करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed