आताच शेअर करा

संपादकीय: सिंधुदुर्ग

दिनांक:२ जून २०२४


बांदा एसटी स्टँड येथे काँक्रीटीकरणचे काम सुरू असून त्या ठिकाणी जीएसबी च्या नावाखाली क्रशरचा डस्ट वापरण्यात आला आहे. सदर कामाचा पाया हा पूर्णपणे कमकुवत असून सदरचे काम बोगस करण्यात आलेले आहे अशी तक्रार शिवसेना तालुका प्रमुख नारायण राणे यांनी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ यांच्याकडे लेखी केली असून कामात सुधारणा न झाल्यास शासनाच्या  व्हिजिलन्स खात्याकडे क्वालिटी शहानिशा करण्याची मागणी करणार असेही त्यांनी म्हटले आहे.
   या पत्रात त्यानी म्हटले की, आपल्या खात्यामार्फत बांदा एसटीस्थानकात काँक्रीटीकरणचे काम सुरू आहे. सदरचे काम निकृष्ट असल्याच्या अनेक तक्रारी माझ्याकडे आलेत. त्यावेळी मी त्यांच्यासमवेत कामाची पाहणी केली असता त्या ठिकाणी काम सुरू होते. मात्र आपल्या खात्याचा कोणीही पर्यवेक्षक किंवा ठेकेदाराला जबाबदार माणूस त्या ठिकाणी उपस्थित नव्हता. सदर कामाच्या ठिकाणी जीएसबीच्या नावाखाली क्रशरची डस्ट वापरण्यात आलेला आहे. त्यामुळे कामाचा पायाच कमकुवत असून काँक्रीटीकरणाचे काम बोगस आहे.  एकंदरीत निकृष्ट कामाचा उत्तम नमुना त्याठिकाणी पाहायला मिळाला. याबाबत आपल्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असता आपण समर्पक उत्तरे देऊ शकला नाहीत. अनेकवेळा आपण फोन घेण्याचे टाळले.
आपल्याकडून सदर कामाची अंदाजपत्रक प्रत मला मिळावी. तसेच सदरचे काम योग्य पद्धतीने केले नाही तर मी शासनाच्या व्हिजिलन्स खात्याकडे क्वालिटी व क्वांटीटीची शहानिशा करण्याची लेखी मागणी करणार असा इशारा नारायण राणे यांनी एमआयडीसी विभागच्या उपअभियंता यांना दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *