
दिनांक: २७ मार्च २०२५
बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर
जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम शिष्यवृत्ती २०२४-२५ या स्पर्धा परीक्षेत जिल्हा परिषद विलवडे शाळा नं. २ प्रशालेतील रुही गुणाजी सावंत (२१८) हिने सावंतवाडी तालुक्यात २०० पेक्षा अधिक गुण मिळवत विद्यार्थी यादीत स्थान मिळविले.
यामध्ये जयेश अजित दळवी (१६८),मेहेक महेंद्र सावंत (१३४), सोनाली मंगेश सावंत (१३०) आदी यशस्वी व सहभागी विद्यार्थीचे सरपंच प्रकाश दळवी, स्कूल कमिटी अध्यक्ष रश्मी सावंत, माजी उपसभापती कृष्णा सावंत ,अंगणवाडी सेविका सायली दळवी ,मनाली दळवी ,केद्रप्रमुख नरेंद्र सावंत व टेंबवाडी उत्कर्ष मंडळ पदाधिकारी यांच्या वतीने अभिनंदन केले.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हा परिषदेत शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय वयातच स्पर्धा परीक्षांची ओळख व्हावी, यासाठी या परीक्षेचे आयोजन करण्यात येते.
यावेळी मुख्याध्यापक सुरेश काळे , उपशिक्षिका सौ. प्रमिला ठाकर यांचे परीक्षेसाठी योग्य मार्गदर्शन लाभले.
सर्व शिक्षक वर्गाकडून तसेच सर्व स्तरावरून विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे.
